बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आगामी भारत दौर्‍यात रोहिंग्यांविषयी चर्चा करणार

डावीकडे पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यावर्षी नोव्हेंबर मासामध्ये भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. या वेळी त्या रोहिंग्या शरणार्थींच्या अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन यांनी ही माहिती दिली. रोहिंग्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याविषयी भारत बांगलादेशला कशा प्रकारचे साहाय्य करू शकतो, यावरही चर्चा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

भारताने रोहिंग्याविषयीच नाही, तर बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या धार्मिक स्थानांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !