नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री अनुकूल !

उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री

नवी मुंबई – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे, अशी माहिती सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली. या नामकरणावरून स्थानिकांनी मागील २ वर्षांपासून आंदोलन चालू केले होते.

सिडकोने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करून राज्यशासनाकडे पाठवला होता; पण सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलने केली. २८ जून या दिवशी समितीतील एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला हरकत नसल्याचे म्हटले, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.