आखाती देश बहरीनमध्ये बनणार पहिले भव्य स्वामीनारायण मंदिर !

मनामा (बहरीन) – आखाती देशातील बहरीनमध्ये आता पहिले भव्य हिंदु मंदिर बांधण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातनंतर बहरीन हा दुसरा आखाती देश असेल, जेथे हिंदू मंदिर बांधण्यासाठी तेथील शाही परिवाराकडून साहाय्य मिळत आहे. बहरीनचे राजकुमार आणि पंतप्रधान सलमान बिन हमद अल खलीफा यांनी स्वामी ब्रह्मविहारीदास आणि स्वामीनारायण संस्थेचे शिष्टमंडळ यांची भेट घेतली. त्यांनी बहरीनमध्ये स्वामीनारायण मंदिर बांधण्यावर चर्चा केली. याच वर्षी १ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचा दौरा केला होता. त्या वेळी बहरीनने हिंदु मंदिर बांधण्यासाठी भूमी देण्याची घोषणा केली होती.

संपादकीय भूमिका

कुठे हिंदूंना मंदिर बांधण्यासाठी भूमी आणि अनुमती देणारा बहारीनसारखा आखातातील इस्लामी देश, तर कुठे हिंदूंचीच प्राचीन मंदिरे बळकावू पहाणारे भारतातील मुसलमान !