महाराजा रणजीत सिंह जयंतीनिमित्त भारतातील ४५० शीख भाविक पाकिस्तानात

शीख भाविक

लाहोर – महाराजा रणजीत सिंह यांच्या १८३ व्या जयंतीनिमित्त ४५० शीख भाविक पाकिस्तानात पोचले आहेत. महाराजा रणजीत सिंह जयंतीनिमित्त लाहोर येथील गुरुद्वारा डेरा साहिबमध्ये २९ जून या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविक गुरुद्वारा करतार साहिब येथेही जाणार आहेत. पाक सरकारने ५०० भारतियांना ‘विजा’ संमत केला होता, त्यांपैकी ४५० जण पाकमध्ये पोचले आहेत.