स्टॉकहोम (स्वीडन) येथे चाकूने केलेल्या आक्रमणात २ जण गंभीर घायाळ !

प्रतिकात्मक छायाचित्र

स्टॉकहोम (स्वीडन) – येथील पश्‍चिमी भागामध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये चाकूने केलेल्या आक्रमणात किमान २ लोक गंभीर घायाळ झाले. १६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ‘आक्रमणामागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही’, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. मार्च मासात दक्षिण स्वीडनमध्ये चाकूने करण्यात आलेल्या आक्रमणात दोन महिला ठार झाल्या होत्या.