देहली येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. अभ्यासू वृत्ती

श्री. नरेंद्र सुर्वे

श्री. नरेंद्र सुर्वे यांना पुष्कळ विषयांचे ज्ञान आहे. मला त्यांच्या सान्निध्यात पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात. ते धर्मशिक्षणवर्ग घेण्यापूर्वी विषयाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करून अभ्यासपूर्ण विषय मांडतात.

२. गुरुकार्याची तळमळ

श्री. देवदत्त व्हनमारे

२ अ. ते धर्मशिक्षणवर्गामध्ये विषय मांडत असतांना त्यांच्या बोलण्यामध्ये गुरुकार्याची तळमळ आणि धर्माविषयीचे प्रेम पहायला मिळते.

२ आ. भाजीविक्रेत्यांना अर्पणाविषयीची माहिती पुष्कळ तळमळीने आणि आत्मीयतेने सांगणे : पुष्कळ वेळा मी नरेंद्रदादांच्या समवेत भाजी अर्पण आणण्याच्या सेवेला जात असे. दादा भाजी अर्पण घेण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करतात. ते प्रत्येक भाजीविक्रेत्याला तळमळीने आणि आत्मीयतेने अर्पणाविषयी माहिती सांगतात. त्यामुळे काही भाजीविक्रेते आम्ही गेल्यावर त्वरित भाजी देतात आणि ‘अजून भाजी हवी का ?’, असेही प्रेमाने विचारतात.

३. भावपूर्ण सेवा करणे

मध्यंतरी दादांकडे साधकांसाठी संध्याकाळी चहा आणि कशाय करण्याची सेवा होती. ते करत असलेला चहा आणि कशाय यांना एक वेगळाच गोडवा अन् चव येत असे. मी दादांना विचारले, ‘‘तुम्ही सेवा करतांना काय भाव ठेवता ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘हा चहा किंवा कशाय पिऊन प्रत्येक गुरुसेवकाचा थकवा निघून गेला पाहिजे. त्याला उत्साह आणि आनंद मिळायला पाहिजे’, असा भाव मी ठेवतो.’’

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे नरेंद्रदादांची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली आणि मला ती लिहिता आली’, याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !

– कु. देवदत्त व्हनमारे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), देहली सेवाकेंद्र (७.११.२०२१)