नम्रता, नियोजनकौशल्य आणि कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणारी बांदोडा, गोवा येथील कु. प्रचीती यतीश गावणेकर (वय २२ वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण नवमी (२२.६.२०२२) या दिवशी कु. प्रचीती यतीश गावणेकर हिचा २२ वा वाढदिवस आहे. कु. प्रचीती गावणेकर ही माझी सर्वांत पहिली आध्यात्मिक मैत्रीण आहे. साधनेत आल्यापासून माझ्याकडून प्रत्येक गोष्ट तिच्या माध्यमातून देवाला सांगितली जायची. या मैत्रीला आता दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत कु. प्रचीतीच्या माध्यमातून भगवंताने मला तिचे अनेक गुण शिकवले. तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. प्रचीती गावणेकर

कु. प्रचीती गावणेकर हिला २२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. नम्रता

कु. प्रचीतीमध्ये पुष्कळ नम्रता असून ती सर्वांशी आदराने बोलते.

२. परिस्थिती स्वीकारणे

कु. अवनी छत्रे

अ. कोणत्याही अडचणीत असतांना ‘ती गोंधळून न जाता लगेच परिस्थिती स्वीकारून पुढे काय करायला हवे’, याचा विचार करते.

आ. कोरोना महामारीच्या काळात सर्व वर्ग ‘ऑनलाईन’ घेऊन परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात आली होती. तिने या परिस्थितीतही व्यवस्थित अभ्यास करून चांगले यश मिळवले.

३. आवश्यक तेवढेच बोलणे

ती काही बोलते अथवा व्यक्त करते, तेव्हा ती अनावश्यक न बोलता विषय थोडक्यात मांडते.

४. नियोजनकौशल्य

ती नियमित नियोजन करते आणि त्याचे काटेकोर पालन करते. त्यात कधी तिचा साधनेत खंड पडला, तरी ती लगेच पुन्हा नियोजन बनवून पुन्हा साधना व्यवस्थित चालू करते.

५. ती अभ्यास आणि व्यष्टी साधना दोन्ही व्यवस्थित सांभाळते.

‘कु. प्रचीतीसारखी गुणवान सखी मला मिळाली आणि हे गुण मला तिच्याकडून शिकता आले’, त्याबद्दल मी गुरुचरणी अनन्य कृतज्ञता व्यक्त करते. ‘तिच्यातील हे गुण मला आत्मसात करता येऊ देत’, हीच गुरुचरणी प्रार्थना आहे.

– कु. अवनी छत्रे (वय २१ वर्षे), बांदोडा, गोवा. (१४.६.२०२२)