अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या निवासाची व्यवस्था करणार्‍या गोमंतकातील देवस्थानांच्या पदाधिकार्‍यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या निवासाची व्यवस्था करून अधिवेशनाला सहकार्य केल्याप्रीत्यर्थ फोंडा तालुक्यातील श्री रामनाथ देवस्थान (रामनाथी), श्री नागेश देवस्थान (नागेशी), श्री शांतादुर्गा देवस्थान (वेलिंग) आणि श्री महालक्ष्मी देवस्थान (बांदोडा) यांच्या प्रतिनिधींचा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन, तसेच पुष्पहार, श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला.

श्री रामनाथ देवस्थानचे कायदेशीर सल्लागार श्री. अवधूत कुंकळीकर यांचा सत्कार करतांना सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे
श्री नागेश देवस्थानचे अध्यक्ष श्री. दामोदर भाटकर यांचा सत्कार करतांना सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे
बांदोडा येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे सदस्य श्री. आशुतोष सरदेसाई यांचा सत्कार करतांना सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे
वेलिंग येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचे डॉ. दत्ता भट यांचा सत्कार करतांना सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे

श्री रामनाथ देवस्थान वर्ष २०१२ पासून हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी त्यांचे सभागृह उपलब्ध करून सहकार्य करत आहे.