दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची छायाचित्रमय क्षणचित्रे

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात गेले ७ दिवस विविध माध्यमांतून हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर करण्यात आला. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या संदर्भात विविध माध्यमांतून जागृती करण्यात आली. देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठ एकमेकांना भेटल्यामुळे सर्वांची एकमेकांशी जवळीक झाली. संतांच्या वंदनीय उपस्थितीमुळे हिंदुत्वनिष्ठांचे संतांचे मार्गदर्शन लाभले. एकमेकांच्या अनुभवांतून भरभरून शिकता आले. ‘सेल्फी पाईंट’सारख्या अभिनव उपक्रमांमुळे अधिवेशनाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसार झाला !

या अधिवेशनातील काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणांचा छायाचित्रमय वृत्तांत…

आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !

अधिवेशनात १७ जून या दिवशी डोंबिवली येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेख श्री. दुर्गेश परुळकर आणि देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी आतापर्यंत झालेल्या एकूण १० अधिवेशनांच्या फलनिष्पतीविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘अधिवेशनाची फलनिष्पती काय आहे ?’, असे पत्रकार विचारतात. सनातन धर्मानुसार आपण जीवनमुक्त होणे आणि आध्यात्मिक प्रगती करणे, हे महत्त्वाचे आहे. वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाल्यानंतर हिंदुत्वाचे कार्य तळमळीने करणारे धर्माभिमानी जीवनमुक्त होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. अधिवेशनात ५ संत झाले आणि आजपर्यंत ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जीवनमुक्त झाले आहेत. हीच या अधिवेशनाची फलनिष्पती आहे. आपण धर्म आणि राष्ट्र यांच्यासाठी कार्य करत आहोत, त्यामुळे हे करतांना आपण शाश्वत मुक्त झाले पाहिजे. सर्व कार्याचे अधिष्ठान ईश्वर असल्यानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.’’

अधिवेशनस्थळी राष्ट्र आणि धर्म यांसाठी आपल्या प्रांतात कृतीच्या स्तरावर कोणते प्रयत्न करणार ? याविषयी गटचर्चा घेण्यात आल्या. या गटचर्चांतून कार्याच्या अभिनव संकल्पना मांडण्यात आल्या, त्यासह कृतीची दिशाही निश्चित करण्यात आली.

अधिवेशनाच्या सभागृहात विविध विषयांवरील फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार, धर्मशिक्षण आणि राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांच्या कार्याची माहिती देणारे प्रदर्शन हिंदुत्वनिष्ठांनी जिज्ञासेने पाहिले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना ‘ऑल इंडिया लिगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी
सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये (उजवीकडे) यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतांना नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी

अधिवेशनस्थळी ‘सेल्फी पॉईंट’च्या (स्वतःचे छायाचित्र काढण्यासाठी उभारलेले ठिकाण) ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठांनी त्याच्या समोर उभे राहून छायाचित्रे काढून ती सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित केली.

हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मकार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी अन्य हिंदुत्वनिष्ठांचा गौरव !

‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’च्या वतीने श्री. अर्जुन संपथ यांच्यासह ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल आणि गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील ‘सत्यमेव जयते’ संघटनेचे श्री. सत्यमेव जयते लोकमंगल आणि हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा गौरव करण्यात आला.

नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी आणि पोखरा येथील ‘विश्व हिंदु महासंघा’चे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी हाँगकाँग येथील उद्योजक श्री. दयाल हरजानी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातनचे सद्गुरु, तसेच संत यांचा रुद्राक्षाची माळ देऊन आणि नेपाळी टोपी देऊन सन्मान केला.

‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांनी १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा सत्कार केला.