येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये १० लाख सरकारी नोकर्‍या देण्यात येणार ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभाग यांमधील मानव सुविधांचा आढावा घेतला आहे. यासमवेतच येत्या दीड वर्षात काम करून १० लाख लोकांची भरती करावी, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारला दिला आहे, असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले.

त्यामुळे आता १० लाख लोकांना सरकारची विविध खाती आणि मंत्रालये यांमध्ये काम मिळणार आहे.