निदर्शने करणार्‍या मुसलमानांकडून पंतप्रधान मोदी यांना अश्‍लाघ्य शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ लेखक तारेक फतेह यांच्याकडून प्रसारित  

पैगंबर यांच्या कथित अवमानाचे प्रकरण

नवी देहली – कॅनडातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत आणि लेखत तारेक फतेह यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून निदर्शने केली जात असल्याचे दिसत आहे. त्यात एक मुसलमान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्‍लाघ्य शिवीगाळ करतांना दिसत आहे. फतेह यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, हे मुसलमान पंतप्रधान मोदी यांची आई आणि बहीण यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देत आहे.’ हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याचा फतेह यांनी उल्लेख केलेले नाही.

या ट्वीटवर भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, ही उघड माहिती पाठवल्यासाठी मी तारेक फतेह यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी इस्लामी देशांना स्वीकारण्याची इच्छा बाळगली असेल; पण मुसलमानांच्या हृदयात त्यांचे काय स्थान आहे ?, हे या व्हिडिओतून समोर आले आहे. या व्हिडिओने त्यांना सावध केले आहे. आता इस्लामी देशांकडून लवकरच या मुसलमानाला ‘फ्रिंज एलिमेंट’ (आमच्याशी संबंध नाही), असे म्हटले जाईल.