नूपुर शर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण !

नूपुर शर्मा

नवी देहली – नूपुर शर्मा यांना आणि त्यांचे कुटुंबीय यांना देहली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. नूपुर शर्मा यांना महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या विधानावरून ठार मारण्याची, तसेच त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या धमक्या मिळाल्यानंतर शर्मा यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.