१. ‘मुकुंद ओझरकरकाका यांच्या तोंडवळ्यावर गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली आयुष्यभर साधना केल्याचे समाधान, एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास, आनंद, शांतपणा आणि स्थिरता
जाणवत होती.
२. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे, तसेच काकांनी व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे केल्यामुळे मला त्यांच्या लिंगदेहाभोवती पिवळ्या रंगाचे संरक्षककवच निर्माण झालेले दिसले.
३. ‘लिंगदेहाचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.
४. सर्व साधक ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मोठ्याने करत असल्याने ‘आजूबाजूला एक मोठे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
५. वातावरणामध्ये जडत्वाचे प्रमाण अल्प होते.’
– श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नाशिक (१२.५.२०२२)