खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तलवारी घेऊन घोषणाबाजी ‘

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ३८ वर्षे पूर्ण !

अमृतसर (पंजाब) – भारतीय सैन्याने वर्ष १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात येथील सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले होते. त्याला ६ जून या दिवशी ३८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ६ जून २०२२ या दिवशी या मंदिराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थकांनी पोलिसांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी केली. हातात तलवारी घेऊन त्यांनी ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यासह खलिस्तानचा त्या वेळी ठार झालेला नेता आणि आतंकवादी जर्नेल भिंद्रनवाले याची छायाचित्रे असणारी भित्तीपत्रके  झळकाण्यात आली. या वेळी लोकांनी सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रवेशद्वरावरच रोखण्यात आले. ‘ऑपरेशन ब्लू स्टारम’ध्ये सैन्याचे ८३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते, तर ४९२ लोकांचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोही खलिस्तान समर्थकांना पकडून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, तरच इतरांवर याचा वचक बसेल !