प्रतिवर्षी पती-पत्नीच्या वादाच्या १ सहस्र ८०० हून अधिक तक्रारी !

जळगाव येथील गंभीर वास्तव !

जळगाव – येथील महिला साहाय्यक कक्षात प्रतिवर्षी पती-पत्नीच्या वादाच्या १ सहस्र ८०० हून अधिक तक्रारी येत आहेत. (एकट्या जळगावमध्ये इतके प्रमाण असेल, तर या समस्येचा संपूर्ण देशाच्या दृष्टीने विचारच न केलेला बरा ! – संपादक) यात क्षुल्लक कारणांमुळे वाद होत असून लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच दांपत्याला पोलिसांचे साहाय्य घ्यावे लागते. या तक्रारींमुळे त्या कक्षासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला साहाय्यक कक्षाची नवीन वास्तू बांधण्यात आली आहे. (समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय काढण्याऐवजी वरवरची उपाय योजणारे पोलीस खाते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, स्त्री-पुरुष समानतेसाठीची चढाओढ, एकमेकांना समजून घेण्याची सिद्धता नसणे, तसेच प्रारब्धभोग अशी अनेक कारणे पती-पत्नीच्या वादांमागे असतात ! वाद अल्प व्हावेत, यासाठी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण आणि साधना करणे हाच यावरील अंतिम उपाय आहे, हे लक्षात घ्या !