हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रशासनाकडे मागणी

म्हापसा, २७ मे (वार्ता.) – हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या सडये, शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’चे प्रशासन आणि ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक यांच्यावर कठोर कारवाई करावी. यासह गोव्यातील धर्मांतराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशा मागण्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २७ मे या दिवशी म्हापसा येथे बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्या. या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत (भाई) पंडित, श्री. जयेश थळी, शिवसेनेच्या गोवा विभागाचे माजी प्रमुख श्री. रमेश नाईक, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रशांत वाळके, महेश शिरगावकर, प्रितम गावकर, श्रीनिवास देशपांडे, सुरज साखरे आणि गोकुळदास कामत यांचा समावेश होता.

पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हिंदुत्वनिष्ठांच्या मागण्या

१. पास्टर डॉम्निक याची संपत्ती आणि त्याला धर्मांतरासाठी मिळणार्‍या आर्थिक साहाय्याची चौकशी करावी.

२. सडये, शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर चर्च’ आणि पास्टर डॉम्निक यांनी धर्मांतर केलेल्या पीडित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात येण्याचे आवाहन करावे. त्यांना गोपनीयता बाळगण्याची आणि सुरक्षेची हमी द्यावी.

३. ‘बिलिव्हर्स’चे ‘फाइव्ह पिलर्स चर्च’ हा हिंदूंच्या धर्मांतराचा हा एक अड्डा आहे. हे चर्च चालवण्यास आणि गावागावांत कार्यक्रम करण्यास निधी कोण पुरवतो ? आणि कुठून पुरवला जातो ? याची चौकशी करावी.

४. ‘बिलिव्हर्स’वर अंधश्रद्धा पसरवण्याच्या कारणावरून कारवाई करावी.

५. हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्याप्रमाणे ‘बिलिव्हर्स’च्या इतर पदाधिकार्‍यांवरही कारवाई करावी.

पोलिसांना दिलेले निवेदन – 

(निवेदन वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

६. ‘बिलिव्हर्सच्या प्रचारकांना रुग्णालयांत प्रवेशबंदी करावी’, अशा आशयाचे फलक रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावावेत आणि हा नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

७. पास्टर डॉम्निक यांची पत्नी जोआना यांचे छायाचित्र असलेले ‘पोस्टर’ ज्यांनी वाहनांवर लावले आहेत ते त्यांनी काढून टाकावे. बिलिव्हर्सचा हा भावनिक खेळ आज उघडकीस आला आहे. पास्टर डॉम्निक याच्या विरोधात आता गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचे छायाचित्र लावून समाजात फिरणे हे अत्यंत अयोग्य गोष्ट आहे. असे छायाचित्र लावून फिरणे म्हणजे त्यांच्या कुकृत्यांचे समर्थन केल्याप्रमाणे आहे. +

८. पास्टर डॉम्निक याच्याबरोबर त्याच्या कृत्याला त्याची पत्नी जोआना तेवढीच उत्तरदायी आहे. पत्नी जोआना हिच्यावर गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती मिळाली आहे. जोआना हिला त्वरित अटक करावी.

९. अटक असलेला पास्टर डॉम्निक आता वैद्यकीय कारणास्तव ‘बायपास सर्जरी’ आणि ‘गॅस्ट्रिक सर्जरी’ झाल्याने जामीन मागत आहे आणि यामुळे पास्टर डॉम्निक करत असलेल्या ‘हिलींग’वर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतरांना तेल लावून बरे करणारा पास्टर डॉम्निक याला शस्त्रक्रियांचा आधार का घ्यावा लागला? स्वत:चा उच्च रक्तदाबाचा प्रश्न सोडवू न शकणारा पास्टर डॉम्निक इतरांच्या ‘हिलींग’द्वारे उच्च रक्तदाब किंवा आरोग्यविषयक समस्या कशा दूर करू शकतो ?

१०. ‘बिलिव्हर्स’च्या कारवायांना बळी पडलेले आणि त्याविरोधात तक्रार करण्यास दबावामुळे पुढे न आलेले यांनी आता पुढे येऊन त्यांचे कटू अनुभव सार्वजनिक केले पाहिजेत आणि त्यांनी तक्रार नोंदवली पाहिजे.

हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या विविध क्लृप्त्या

‘बिलिव्हर्स’च्या हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या विविध क्लृप्त्या 

१. ‘बिलिव्हर्स’च्या गोव्यात अनेक ठिकाणी प्रत्येक आठवड्यात प्रार्थना होत असतात. ‘हिलींग’च्या गोंडस नावाने, विनामूल्य वैद्यकीय शिबिरे किंवा योगासने शिकवत असल्याचे सांगून हिंदूंना आकर्षित करणे, पैशांचे आमीष दाखवणे, असाध्य रोग बरा होणार, असे सांगणे आदी माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. अशा कार्यक्रमात धर्मांतरीत झालेल्या हिंदूंचे अनुभवकथन करून धर्मांतर होऊ पहाणार्‍यांवर प्रभाव पाडला जातो.

२. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये असाहाय्य झालेल्या हिंदु रुग्णांना ‘हिंदू देवतांची भक्ती करू नका, तर ‘जीझस’ची भक्ती केल्यास आजार बरा होईल’ असे सांगून हिंदूंची बुद्धीभ्रष्ट केली जाते. रुग्णालयात भरती करण्यात आलेले रुग्ण किंवा त्याच्यासोबत असलेले सहकारी यांना ‘बिलिव्हर्स’चे प्रचारक ‘बायबल’ विनामूल्य देतात. हिंदूंच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवून त्यांचे धर्मांतर केले जाते.

३. बिलिव्हर्सच्या प्रभावाखाली आलेल्या धर्मांतरित हिंदूंना त्यांच्या घरासमोरील तुळस मोडण्यास सांगणे, घरातील हिंदु देवतांच्या छायाचित्रांवरून चालण्यास सांगणे, घरातील हिंदूंच्या देवता किंवा मूर्ती फेकण्यास भाग पाडणे, असे प्रकार केले जातात. धर्मांतरित हिंदूंना गणेशचतुर्थी आदी धार्मिक परंपरा पाळण्यास मज्जाव केला जातो. अशा घटनांमुळे कुटुंब आणि गावात कलहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि कुटुंबात भांडणे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

४. एक हिंदु व्यक्तीचे लग्न झाले. लग्नानंतर दुसर्‍या दिवशी धार्मिक विधी करण्यासाठी एकत्र बसले असता नववधू हिंदूंचा धार्मिक विधी करण्यास नकार देऊ लागली आणि यानंतर नववधू ‘बिलिव्हर्स’च्या जाळ्यात अडकल्याचे नवराच्या लक्षात आले. मोठ्या दिमाखाने लग्न केल्यानंतर असा प्रकार घडल्याने त्यांच्या पदरी फार मोठी निराशा आली. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.

५. मुल नसणारे हिंदू शिवोली येथे पास्टर डॉम्निक यांना फाइव्ह पिलर्स चर्चमध्ये जाऊन भेटायचे. त्यांना कदाचित् तेथे जाऊन मुल झाले तर हे मूल ‘जीझस’ आहे किंवा ‘तो जीझसचा दास किंवा दासी आहे’ असे सांगून त्या मुलाला ख्रिस्ती नाव ठेवण्यास भाग पाडले जायचे.

६. धर्मांतर करण्यासाठी पास्टर डॉम्निक यांचे कार्यक्रम गोव्यातील काही वृत्तवाहिन्या किंवा केबल नेटवर्क याद्वारे दाखवले जात आहेत. हे कार्यक्रम दाखवण्यासाठी ‘बिलिव्हर्स’ वृत्तवाहिनी किंवा केबल नेटवर्क यांना दरमहा मोठी रक्कम देत असतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले केबल नेटवर्क अथवा वृत्तवाहिन्या ‘बिलिव्हर्स’च्या कार्यक्रमांचे प्रसारण करत असतात. हा कार्यक्रम मुख्यत: हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीच असतो. यामध्ये धर्मांतरित हिंदू ‘आपण रोगातून मुक्त कसे झालो?’ आदी खोटी माहिती सांगत असतात. या कार्यक्रमाद्वारे अंधश्रद्धाच पसरवली जाते.

७. ‘बिलिव्हर्स’च्या प्रभावाखाली आलेले हिंदू समाजात फिरत असतांना त्यांच्या खिशाला पास्टर डॉम्निक आणि त्यांचे पत्नी यांचे छायाचित्र असलेले पेन लावतात. तसेच त्यांच्या वाहनांवर असे छायाचित्र असलेले स्टिकर लावले जातात. पास्टर डॉम्निक हे याद्वारे आपला प्रचार करत आहेत.

८. पास्टर डॉम्निक याने हिंदूंना शिवोली येथील चर्चकडे ये-जा करण्यासाठी बससेवा ठेवली आहे.

९. एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ही व्यक्ती ‘बिलिव्हर्स’च्या प्रभावाखाली आल्यानंतर त्याने उच्च रक्तदाबासाठी चालू असलेले वैद्यकीय उपचार बंद केले. वैद्यकीय उपचार बंद केल्याने त्या व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका येऊन तिचे निधन झाले.

डॉमनिक पती-पत्नी (डावीकडे) आणि इतर पदाधिकारी

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’ आणि पास्टर डॉम्निक यांच्या संशयास्पद घटना

१. वर्ष २०११ मध्ये ‘बिलिव्हर्स’च्या शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’ जवळील एका रोमन कॅथोलिक चर्चमधील अनुयायी आणि बिलिव्हर्स यांच्यामध्ये मोठे भांडण झाले होते. नाताळाच्या वेळी कॅथोलिक चर्चमध्ये प्रार्थना चालू असतांना ‘बिलिव्हर्स’ पंथियांनी हेतूपुरस्सर त्या ठिकाणी फटाके उडवून भांडण उरकून काढले होते. कॅथोलिक चर्चच्या अनुयायांनी ‘बिलिव्हर्स’च्या चर्चवर आक्रमण केले. या वेळी काही बिलिव्हर्स’वाल्यांना यथेच्छ चोप दिला होता. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून ‘बिलिव्हर्स’ना गावाबाहेर काढल्याने प्रकरण निवळले. यानंतर पोलिसांत तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

२. १३ जून २०१२ या दिवशी दुपारी ‘फाइव्ह पिलर्स चर्च’ प्रार्थनेच्या वेळी पास्टर डॉम्निक हिलींग करतांना एक कार्यकर्ता भूमीवर कोसळला. ‘तो पास्टरच्या आशीर्वादाने खाली पडला आणि आता त्याच्या आशीर्वादाने तो उठेल’ या भावनेने त्या व्यक्तीला कुणीही वैद्यकीय उपचारासाठी नेले नाही. संबंधित व्यक्ती बराच वेळ न उठल्याने त्याला वैद्यकीय उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसर्‍या दिवशी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी ‘बिलिव्हर्स’च्या विरोधात म्हापसा पोलिसात तक्रार नोंदवली; मात्र पुढे याविषयी काहीच झाले नाही. वास्तविक या वेळी पास्टर डॉम्निक याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवणे आवश्यक होते; मात्र ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झाली.

३. पास्टर डॉम्निक यांच्याकडे ‘मर्सिडीस बेंज’ आदी महागड्या गाड्या आहेत. वाहतूक खात्याचा एक माजी अधिकारी डॉम्निक याला या महागड्या गाड्यांवरील कर माफ करत होता. ही माहिती ‘माहिती अधिकाराखाली’ उघड झाली आहे.

४. पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.