आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग १४)

पू. तनुजा ठाकूर

१. घराला आश्रम बनवण्यासाठी काय करावे ?

साधकांनो, आपल्या घरात देवत्व निर्माण करण्यासाठी घराला आश्रमासारखे चैतन्यमय बनवण्याचा प्रयत्न करावा.  त्यामुळे आपत्काळातही तुमच्या वास्तूवर देवाच्या कृपेचे कवच राहील. ते अस्तित्वात राहील, तुमचे रक्षण करील आणि ते साधनेसाठी पोषकही होईल. त्यामुळे ‘आपले घर हे गुरूंचा आश्रम किंवा आपल्या आराध्यदेवाचे मंदिर आहे’, अशा भावाने तेथे रहावे. ‘त्यांची दृष्टी सतत आपल्यावर आहे’, असा भाव ठेवावा. आश्रमाप्रमाणेच घरातही वर्तन करावे. गुरूंना अपेक्षित असल्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करावा.

२. गुरूंप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?

हा संस्कार मनात बिंबवण्यासाठी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी की, त्यांनी आम्हाला आपल्या आश्रमरूपी घरात रहाण्याची सुवर्णसंधी दिली आहे. ‘हा आमच्या श्रीगुरूंचाच आश्रम आहे. मी केवळ त्यांचा सेवक आहे’, असा भाव ठेवावा.

(क्रमश:)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)