चंडीगड (पंजाब) – पंजाबच्या अमृतसरस्थित ‘श्री अकाल तख्त’चे प्रमुख ग्यानी हरप्रीत सिंह यांनी शिखांना आधुनिक शस्त्रे बाळगण्याचा सल्ला दिला. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ग्यानी हरप्रीत सिंह यांनी दावा केला आहे की, गुरु हरगोविंद साहिब यांनी चार युद्धे लढली आणि त्यामध्ये विजय प्राप्त केला. ते म्हणाले की, आता वेळ आली आहे की, शिखांनी बलशाली बनावे आणि प्रत्येक शीखही शस्त्रधारी बनावा. शिखांनी अत्याधुनिक शस्त्रे, तलवारबाजी, धनुर्विद्या यांच्या प्रशिक्षणावर आणि गुरूंच्या नावाचा जप करण्यावर भर द्यावा.