वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये वजूखान्यामध्ये (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) शिवलिंग सापडल्यानंतर आता काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी ‘वजूखान्याच्या तळाशी शिवलिंग आहे’, असा दावा केला आहे, तसेच त्यांनी काशी विश्वनाथ धाम संकुलातील नंदीच्या मुखासमोरील दरवाजा उघडून बाबा श्री विश्वेश्वर महादेवाची पूजा करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणीही केली.
काशी विश्वनाथ मंदिर के महंत कुलपति तिवारी ने #ज्ञानवापी_मस्जिद में प्रतिदिन भोग आरती के साथ पूजा की मांग की है.
#GyanvapiSurvey #Varanasi @SabeenaTamang @YatendraMedia pic.twitter.com/IjTIs5JxKh
— News18 India (@News18India) May 23, 2022
डॉ. कुलपती तिवारी यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ काही जुनी छायाचित्रेही प्रसारित केली. ते म्हणाले की, वजूखान्याच्या तळाशी उपस्थित असलेल्या बाबांवर कुणाचाही दावा नाही. माझ्याकडे तळाशी असलेल्या शिवलिंगाचे पुरावेही आहेत, जे मी न्यायालयात सादर करणार आहे. पुरावे सापडले, म्हणजे श्री विश्वेश्वर बाबांची पूजा करणे आवश्यक आहे. जे शिवलिंगाला कारंजा म्हणत आहेत, तो पहिल्या मजल्यावर आहे. मी तळमजल्यावर उपस्थित असलेल्या बाबा विश्वेश्वरांची पूजा करण्याची अनुमती माग आहे.