एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यावरील अवैध बांधकाम प्रशासनाने पाडले !

समाजवादी पक्षाकडून विरोध !

धर्मांधांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर फिरवला !

एटा (उत्तरप्रदेश) – येथे जिल्हाधिकार्‍यांच्या घराच्या शेजारी आणि जिल्हा न्यायाधिशाच्या घरासमोर असणार्‍या मल्लेशाह दर्ग्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेले अवैध बांधकाम प्रशासनाकडून पाडण्यात आले. (जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांच्या घराजवळ अवैध बांधकाम चालू असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? उद्या आतंकवादी यांच्या घराजवळ काही घातपात करतील, तर पोलीस आणि प्रशासन काय करणार आहे ? – संपादक) याला समाजवादी पक्षाकडून विरोध करण्यात आला.

या दर्ग्याच्या वर काही खोल्या अवैधरित्या बांधण्यात आल्या होत्या. त्या पाडण्यात आल्या आहेत. समाजवादी पक्षाकडून आमदार प्रदीप यादव यांनी सांगितले की, या कारवाईचे सूत्र विधानसभेत उपस्थित केले जाईल. (समाजवादी पक्षाने कधी हिंदूंच्या समस्या विधानसभेत मांडल्या आहेत का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या अवैध बांधकाम पाडण्याच्या प्रशासनाच्या कृतीला विरोध करणारा समाजवादी पक्ष कायदाद्रोही आणि राज्यघटनाविरोधी होत !