ज्ञानवापीत सापडलेली वस्तू ‘शिवलिंग’ असल्याचे सिद्ध झाल्यास मुसलमानांनी मशीद हिंदूंना सोपवावी !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशीद परिसरात सापडलेली वस्तू शिवलिंगच आहे, हे न्यायालयात सिद्ध झाले, तर मुसलमानांनी स्वतःहून मशीद हिंदूंना सोपवावी. यामुळे बंधूभाव वाढेल आणि ते सर्वांसमोर एक मोठे उदाहरण सिद्ध होईल, असे आवाहन येथील भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री रवींद्र जायसवाल यांनी केले आहे.

मंत्री जायसवाल पुढे म्हणाले की, मंदिर पाडून तेथे मशीद बनवली जात असेल, तर तेथे केलेली प्रार्थना अल्ला स्वीकारत नाही. देशात अशी अनेक मंदिरे पाडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदूंवर आघात झाले आहेत. अशी ठिकाणे मुसलमान बंधूंनी हिंदूंना सोपवली पाहिजेत.

संपादकीय भूमिका

काशी विश्‍वनाथाचे मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. तरीही गेली साडेतीन शतके मुसलमान ही जागा हिंदूंना देत नाहीत आणि आजही ते सर्वेक्षणातून सिद्ध झाल्यानंतरही त्याला न्यायालयात जाऊन विरोध करत आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा करणे कितपत संयुक्तिक ठरेल ?