श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !  

हिंदु महासभेकडून न्यायालयात याचिका

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश कौशिक

मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर (भगवान श्रीकृष्णावर) जलाभिषेक करण्याची अनुमती मागणारी याचिका येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश कौशिक यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी जलाभिषेक करण्याची अनुमती मागितली आहे, तेच भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचे मूळ गर्भगृह आहे.