|
सिरमौर (हिमाचल प्रदेश) – येथील माजरा गावामध्ये शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचा अध्यक्ष नसीम नाज आणि एका केशकर्तनालयाचा मालक अरमान मलिक यांना पोलिसांनी अटक केली. यामुळे संतप्त झालेल्या मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर लाठीकाठी आणि तलवार घेऊन आक्रमण केले.
Himachal Pradesh: BJP minority morcha leader Naseem Naaz and one Armaan Malik arrested for derogatory remarks against Shivling, party suspends Naazhttps://t.co/AZFpapMbOU
— OpIndia.com (@OpIndia_com) May 18, 2022
याची माहिती हिदूंना मिळाल्यावर तेही मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर पोचले. दोन्ही बाजूंनी या वेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अरमान मलिक याने, ‘माझ्या ‘कमोड’ची (पाश्चात्त्य पद्धतीच्या शौचालयाची) सीटही दगडाची आहे. तीही पडताळून पहा. ती शिवलिंग असू शकते’, असे संतापजनक वक्तव्य फेसबूकवर प्रसारित केले होते. त्याला नसीम राज याने पुढे प्रसारित केले. यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली. ज्ञानवापी मशिदीच्या परिसराच्या वजू खान्यात (नमाजाच्या आधी हात-पाय धुण्याचे ठिकाण) शिवलिंग सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर मलिक याने फेसबूकवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केली होती.
याविषयी राज्याचे मंत्री आणि भाजपचे स्थनिक आमदार विधायक सुखराम चौधरी यांनी म्हटले, ‘ही घटना हिंदु आणि मुसलमान यांच्यात तणाव निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे.’ भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी सांगितले की, देवतांचा अवमान सहन केला जाणार नाही.
संपादकीय भूमिकाराज्यात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे पोलीस ठाण्यावर तलवारींसह आक्रमण करण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? शिवलिंगाचा अवमान करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पक्षाकडून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते ! |