वैशाख पौर्णिमा (१६.५.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारी कु. मृण्मयी गांधी हिचा २८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त कु. अमृता मुद्गल (वय १९ वर्षे) हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. मृण्मयी गांधी हिला २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. समाधानी वृत्ती
कु. मृण्मयीताई तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे; पण ती कधीच कसला हट्ट करत नाही. ती समाधानी वृत्तीची आहे. तिला जे मिळते, त्याविषयी तिला कृतज्ञता वाटते.
२. तिला खाण्याविषयी कुठलीही आवड-नावड नाही.
३. सेवेची तळमळ
ताई कधी कधी रात्री उशिरापर्यंत जागून सेवा करते, तरीही ती सकाळी उठून वेळेवर सेवेला येते. ती सेवेत कधीच सवलत घेत नाही आणि आळसही करत नाही. ती मन लावून सेवा करते. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तिला हक्काने आणि विश्वासाने सेवा सांगतात.
४. तत्त्वनिष्ठता
ताई मला माझी चूक तत्त्वनिष्ठपणे सांगते. तिने चूक सांगितल्यावर माझी अंतर्मुखता वाढते.
– कु. अमृता मुद्गल, (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२. ०२. २०२२)