‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ शिबिरासाठी आलेल्या दोन धर्मप्रेमींना आलेला चांगला अनुभव !
१. रेल्वे प्रवासात बॅगा तपासायला आलेल्या पोलिसांनी चौकशी करणे
‘रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरासाठी बुलढाणा जिल्ह्यातील दोन धर्मप्रेमी आले होते. परतीच्या प्रवासात ते एका आरक्षित डब्यात बसले होते. रात्री सामानाची तपासणी करण्यासाठी काही पोलीस त्या डब्यात आले. त्यांनी या दोघांची चौकशी केली. त्यांच्यापैकी दोन पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासायला आरंभ केला. चौकशी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना ‘तुम्ही कुठून आला ? कुठे चालला ?’, असे प्रश्नही विचारले.
२. धर्मप्रेमींनी पोलिसांना ‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो’, असे सांगून समितीचे कार्य सांगणे आणि त्यांनी ‘हे चांगले कार्य करतात’, असे सांगणे
त्या दोन धर्मप्रेमींनी पोलिसांना सांगितले, ‘‘आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो. आता आम्ही स्वतःच्या गावी परत जात आहोत.’’ हिंदु जनजागृती समितीचे नाव ऐकताच त्यातील एका पोलिसाने समितीचे कार्य दोघांकडून जाणून घेतले. यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘समिती कार्य चांगले असून तुम्ही असेच कार्य करा. या कार्याची आज आवश्यकता आहे.’’
३. पोलिसांचे समितीविषयीचे मत ऐकून दोघांची भावजागृती होणे
या दोन्ही धर्मप्रेमींना प्रवासात समितीच्या नावाचे माहात्म्य कळताच त्या दोघांचीही भावजागृती झाली आणि ‘आपण योग्य मार्गावर आहोत’, याची त्यांना निश्चिती झाली.’
– श्री. श्रीकांत पिसोळकर, अमरावती (२.८.२०१८)