केंद्र सरकार प्रतिवर्षी २१ मे हा ‘आतंकवादविरोधी दिवस’ म्हणून साजरा करणार !

नवी देहली – प्रतिवर्षी २१ मे हा दिवस ‘आतंकवादविरोधी दिवस’ म्हणूून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पाठवले आहेत. सर्व सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे येथे आतंकवादविरोधी शपथ देण्यात येणार आहे. येत्या २१ मे हा सुटीचा दिवस असल्याने यंदा २० मे या दिवशी ही शपथ दिली जाणार आहे.

या आदेशात म्हटले आहे, या माध्यमातून तरुणांना आतंकवाद आणि हिंसा यांपासून दूर ठेवण्यासाठी जागृती निर्माण केली जाईल. आतंकवाद नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणार्‍या योजनांविषयीही माहितीही दिली जाणार आहे. जर तरुण योग्य मार्गावर असतील, तर आतंकवाद आपोआपच नष्ट होईल.

संपादकीय भूमिका

  • ‘आतंकवादविरोधी दिवस’ नाही, तर ‘आतंकवाद नष्ट केल्याचा दिवस’ साजरा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. काश्मीरमध्ये अद्यापही आतंकवाद नष्ट होऊ शकलेला नाही. तेथे हिंदू अजूनही मारले जात आहेत, याकडे गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे !
  • आतंकवाद कोणत्या पंथाचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच अधिक लक्ष देऊन त्यांची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न केला, तर देशातील आतंकवाद लवकर नष्ट होईल !