केरळमधील संघ पदाधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय. च्या आणखी ४ जणांना अटक

अटकेतील संख्या पोचली २० वर !

पलक्कड (केरळ) – जिल्ह्यात गेल्या मासात झालेल्या रा.स्व. संघाच्या एका नेत्याच्या हत्येच्या प्रकरणी आणखी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या २० वर पोचली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) विजय साखरे यांनी दिली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व २० जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या संघटनेचे किंवा तिची राजकीय आघाडी असलेल्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे एकतर कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत, असेही साखरे म्हणाले. पी.एफ्.आय.चा नेता सुबैर याच्या १५ एप्रिलला झालेल्या हत्येचा सूड उगवण्यासाठी श्रीनिवासन् या संघाच्या पदाधिकार्‍याला मारण्यात आले, असे साखरे यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

केरळमधील साम्यवादी सरकार कधीही पी.एफ्.आय.सारख्या जिहादी संघटनेच्या विरोधात बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार नाही ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनेच पुरावे गोळा करून स्वत:हून तिच्यावर बंदी घातली पाहिजे !