सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणाऱ्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
१. ‘सुवर्ण शरिरातील प्रतिकूल कीटाणूंचा नाश करते. – ब्राह्मणग्रंथ’
२. सर्व धातूंमध्ये सोने हा सर्वांत सात्त्विक धातू आहे.
३. सोने हा सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करणारा धातू : ‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’ यामुळे सोन्याचे अलंकार परिधान करणाऱ्या व्यक्तीला सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.’
४. सोन्यातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजोमय लहरींमुळे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होणे : ‘अलंकार सोन्याचे असल्याने, तसेच सोने हा धातू तेजोमय, म्हणजेच तेजतत्त्व प्रदान करणारा असल्याने या धातूतून प्रक्षेपित होणाऱ्या तेजोमय लहरींमुळे स्त्रीच्या शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन तिच्या आधारे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होऊन संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, या नावानेही लिखाण करतात. १७.१२.२००५)
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’)
दागिन्यांत जडवलेल्या रत्नांचा शरिरावर चांगला परिणाम होणे


‘सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळे खडे, हिरा, माणिक, पोवळे, पाचू यांसारखी रत्ने जडवलेली असतात. या रत्नांमुळे शरिराला वेगळे तेज प्राप्त होते. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांच्यापासून येणारे किरण रत्नांमधून परावर्तित झाल्यामुळे त्याचा शरिरावर चांगला परिणाम होतो. सध्या ही रत्ने कृत्रिमरीत्या बनवून मिळू लागल्याने त्यांचा खरा परिणाम दिसत नाही.’
अलंकारांत जडवलेल्या विविध रत्नांचा शरिरावर होणारा परिणाम
१. माणिक : ‘हे शक्तीदायी असल्याने ते स्थूलदेहाला संरक्षण देऊ शकते.
२. हिरा : हिऱ्यातून प्रक्षेपित होणारे तेज हे प्रवाहातील गतीमानतेत सातत्य राखणारे असल्याने ते अल्प (कमी) कालावधीत स्थूलदेहाची आणि मनोदेहाची शुद्धी करू शकते.
३. पोवळे : हे अधिक प्रमाणात शरिरातील प्राणशक्तीतत्त्वात्मक चेतनेला जागृती देणारे असल्याने ते क्रियाधारकतेचे प्रतीक म्हणून वापरले जाते. याच्या स्पर्शाने कार्यातील उत्तेजनेत वृद्धी होते.
४. मोती : हे आपतत्त्वस्वरूप शीतलरूपी तारकतेचे प्रतीक असल्याने याच्यामुळे जिवाला सतत जागृत चेतनेच्या रूपात सजगता आणि प्रसन्नता प्राप्त होते.
५. पाचू : हे तारकतेचे, म्हणजेच शक्तीरूपी तारकता घनीभूत करून ठेवण्याचे प्रतीक असल्याने अप्रकट शक्तीतत्त्वात सातत्य राखण्यासाठी याचा उपयोग केला जातो.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ ( श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.३९)
सोने, मोती आणि हिरे यांनी बनवलेल्या अलंकारांत आकृष्ट होणाऱ्या लहरी

टीप १ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.११.२००७, सकाळी ११.२८
टीप २ : कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून
टीप ३ : हिऱ्यामध्ये तेजतत्त्व आकृष्ट करून ते शक्तीच्या स्तरावर घनीभूत करण्याची क्षमता प्रक्षेपणापेक्षा अधिक असते; परंतु सोने इतर सर्व धातूंच्या तुलनेत सर्वांत अधिक प्रमाणात तेजतत्त्वग्राही आणि तेजतत्त्वप्रक्षेपी आहे.
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ ( श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.३९)
शुभ आणि अशुभ स्वप्ने अन् त्यांची फलप्राप्ती !
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?