१. सूक्ष्म-चित्राविषयी सूत्रे
१ अ. लिंगदेहांचा समावेश असलेला काळा प्रवाह भूलोकापासून पितृलोकापर्यंत कार्यरत होणे : उदक कुंभाचे दान देण्याच्या या कृतीतून पितरांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होऊन त्यांच्यावरील अतृप्त इच्छांचे आवरण दूर होते. त्यांना गती प्राप्त होते आणि ते पुढील लोकांतील प्रवास करतात.
१ आ. उदक-कुंभामध्ये तमोगुणी काळसर वलय कार्यरत होणे
१ इ. दान देणाऱ्या व्यक्तीवर उपाय होऊन तिच्या देहावरील काळे आवरण दूर होणे
१ ई. व्यक्तीभोवती संरक्षक कवच निर्माण होणे.’
– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.४.२०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. |