|
नवी देहली – भारतीय सैन्याने ‘इफ्तार पार्टी’शी (मेजवानीशी) संबंधित एक ट्वीट केल्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यास प्रचंड विरोध करण्यात आला. यामुळे सैन्याला हे ट्वीट हटवावे लागले.
१. सैन्याने जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन केले होते. सैन्याने ट्वीट करून ही माहिती देत त्याची छायाचित्रे प्रसारित केली होती. सैन्याने ट्वीटमध्ये म्हटले होते, ‘धर्मनिरपेक्षतेची परंपरा जिवंत ठेवत भारतीय सैन्याने डोडा जिल्ह्यातील अर्नोरा येथे इफ्तारचे आयोजन केले होते.’
२. या ट्वीटवर टीका करतांना एकाने ट्वीट करून म्हटले ‘आता हा आजार सैन्यातही दाखल झाला. दुःखद.’
३. याविषयी सैन्याकडून अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही; मात्र एका सैन्याधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांना सांगितले की, जनतेशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी रमझानच्या काळात इफ्तारच्या मेजवान्या नियमितपणे आयोजित केल्या जातात. या वेळीही जम्मू-काश्मीरमध्ये परंपरेनुसार अशी मेजवानी आयोजित करण्यात आली होती.