अहिल्यानगर – शहरातील मुख्य कापड बाजार पेठेतील व्यापारी महिलेचा विनयभंग अमजेद आशिफ खान याने केला. तसेच तिच्या नातेवाइकांना मारहाण करून ‘सगळ्यांना बघून घेईन’, अशी धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे. धर्मांध आरोपीने दुकानासमोर हातगाडी लावून गर्दी केली, तेव्हा ‘दुकानासमोर गर्दी करू नका’, असे म्हटल्यानंतर आरोपीने महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपी अमजेद याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकावासनांधांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |