भारतालाही अमेरिकेतील मानवाधिकारांच्या हननाविषयी चिंता व्यक्त करण्याचा अधिकार !

भारतातील मानवाधिकारवरून चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेला भारताने ठणकावले !

भारताने अमेरिकेच्या विरोधात परखडपणे मांडलेली ही भूमिका अभिनंदनीय आहे. अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांच्या विरोधात असेच आक्रमक धोरण राबवणे, ही काळाची आवश्यकता आहे ! – संपादक

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन व भारताचे परराट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारतातील काही घटनांवरून मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून चिंता व्यक्त केली होती. यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जयशंकर म्हणाले, ‘‘जगातील कोणत्याही व्यक्तीला भारताविषयी त्याचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच आम्हालाही अमेरिका आणि अन्य देशांतील मानवाधिकारांच्या हननाविषयी मत मांडण्याचा अधिकार आहे. मतपेटीच्या राजकारणामुळे अशी मते मांडली जातात. अमेरिकेसमवेत जगातील अन्य ठिकाणी आमच्या लोकांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले, तर त्याविषयी आम्हीही चिंता व्यक्त करू.’’