उत्तरप्रदेशात ४ शाळांमध्ये कोरोनाचे १९ रुग्ण आढळले !

नवी देहली – उत्तरप्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडा येथील प्रत्येकी २  शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या ४ शाळांमध्ये कोरोनाचे १९ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी १३ जण नोएडातील खेतान शाळेतील आहेत. विद्यार्थ्यांसह ३ शिक्षिकाही कोरोनाबाधित झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी या शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा पुन्हा पुढील काही दिवसांसाठी ऑनलाईन चालू करण्यात आल्या आहेत.