४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
चंद्रपूर – गेल्या काही दिवसांत पालटत्या हवामानामुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथे पुष्कळ उन्हाळा आहे. चंद्रपूर येथे शहराचा जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये समावेश झाला असून २९ मार्च या दिवशी येथील तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर पोचला होता. २९ मार्च या दिवशी मालीतीलगेल्या काही दिवसांत पालटत्या हवामानामुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथे पुष्कळ उन्हाळा आहे. चंद्रपूर येथे शहराचा जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये समावेश झाला (पश्चिम आफ्रिकेतील) कायेस हे शहर पृथ्वीतलावरील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. येथील तापमान ४४.४ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर तेथीलच सेगोऊ शहराचा दुसरा क्रमांक आहे. तेथील तापमान ४३.८ अंश इतके होते. त्यानंतर चंद्रपूरचा क्रमांक होता.
सर्वाधिक उष्ण शहरांच्या सूचीत पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील काही शहरांचा समावेश आहे. यात अकोला (विदर्भ), तसेच भारतातील पिलानी आणि चुरू ही शहरे यांचा समावेश आहे.