ऋषिमुनींनी अखिल मानवजातीला प्रकाश दाखवणे आणि सर्वसामान्य मनुष्याने मात्र भगवंताने दिलेल्या सर्व सुविधांचा उपयोग साधनेसाठी न करता त्यांचा दुरुपयोग करणे

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

परात्पर गुरु पांडे महाराज

‘नुसते वय वाढणे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे, यांत भेद आहे. आपले केवळ वय वाढत जाते आणि आपण जीवन जगण्याची संधी गमावत रहातो. ऋषिमुनींनी स्वतःचे आयुष्य घालवून अखिल मानवजातीसाठी अंतिम सत्य उघड करून ठेवले आहे. आपल्याला प्रकाश दाखवला आहे; मात्र आपण अंधारात राहून सर्वत्र अंधःकार पसरवला आहे. आपण मिळालेला मनुष्यजन्म, या जीवनात मिळालेला कालावधी आणि मिळालेल्या सर्व सुखसुविधा यांचा दुरुपयोग करत आहोत. भगवंताने पुष्कळ दिले आहे; पण आपण त्याचा सदुपयोग करत नाही. पैसा आणि धनदौलत यालाच ‘संपत्ती’ समजून महत्त्व देतो. असे न करता ‘साधना करून आपले कल्याण करणे’, हेच इतिकर्तव्य आहे.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (११.१०.२०१७)