पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतून शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमात २७ फेब्रुवारी या दिवशी बोलतांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने सर्व मराठी नागरिकांना मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या. मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि ज्ञानपिठ पुरस्कारप्राप्त विष्णु वामन शिरवाडकर अर्थात् कुसुमाग्रज यांची जयंती असल्याचे सांगत त्यांनी याविषयी माहिती दिली. जगातील सर्वांत जुनी भाषा म्हणून तमिळ, तर जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये हिंदी ही भाषा तिसर्‍या क्रमांकावर असलेचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी आपण ‘मातृभाषा दिन’ साजरा केला. यातील तज्ञ लोक ‘मातृभाषा शब्द कोठून आला ?’, तसेच ‘त्याची उत्पत्ती कशी झाली ?’ यांविषयी अधिक माहिती देऊ शकतात. जशी आपली आई आपले आयुष्य घडवते, तशीच मातृभाषा आपले जीवन घडवते.’’