१. गंगा
१. ‘गमयति भगवत्पदमिति गङ्गा ।’ म्हणजे जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोचवते ती गंगा’.
२. ‘गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिति गङ्गा ।’ म्हणजे मोक्षार्थी अर्थात् मुमुक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय.
गंगा नदी हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावून अनेक उपनद्यांद्वारे बंगालच्या उपसागराला मिळते. हिची एकूण लांबी २ सहस्र ५१० कि.मी. आहे. गंगा नदीत आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदूषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पातिव्रत्य कायम टिकते; म्हणूनच विश्वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तरी गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे सूक्ष्मातील कळणार्यांनाच नाही, तर शास्त्रज्ञांनाही जाणवते.
२. चंद्र
शिवाच्या मस्तकी चंद्र आहे. चंद्रमा ही ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.
३. तिसरा डोळा
अ. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्त शक्तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्तीचे महापीठ आहे. यालाच ज्योतिर्मठ, व्यासपीठ इत्यादी नावे आहेत.
आ. शिवाचा तिसरा डोळा हा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शिवाच्या चित्रातही तिसर्या डोळ्याचा आकार ज्योतीसारखा आहे.
इ. शिवाने तिसर्या डोळ्याने कामदहन केले आहे. (खर्या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. एवढेच नाही, तर खरा ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाग्नीने कामनांना जाळून टाकतो.)
४. नाग
नागाला शिवाचे आयुधही समजले जाते. विश्वातील ९ नागांना ‘नवनारायण’ असेही म्हणतात. नवनाथांची उत्पत्ती ९ नागांपासूनच झाली आहे. कार्तिकेय, जोतिबा, रवळनाथ आणि सब्बु हे नागरूप देव आहेत.
५. भस्म
शिवाने सर्वांगाला भस्म लावले आहे. भस्माला शिवाचे वीर्य असेही समजतात.
६. रुद्राक्ष
केसांचा बुचडा, गळा, दंड, मनगटे आणि कटी (कंबर) अशा ठिकाणी शिवाने रुद्राक्षमाळा धारण केल्या आहेत.
७. व्याघ्रांबर
वाघ (रज-तम गुण) क्रूरतेचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिव (भाग २)’)