नागपूर येथील क्रीडा विभागाने प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार !

नागपूर – खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण आहे. तरीही काही उमेदवारांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्‍या घेतल्याचे उघड झाल्यानंतर क्रीडा विभागाने क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया चालू केली. बनावट क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांना एक संधी म्हणून बनावट क्रीडा प्रमाणपत्र समर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा विभागाने प्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल जमा न केल्यास सरकारच्या वतीने फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय आणि क्रीडा अन् युवक सेवा विभागीय उपसंचालक यांच्याकडून बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल अशा उमेदवारांना, तसेच त्या आधारे नोकरी धारण केली आहे, अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा प्रमाणपत्र आणि मूळ क्रीडा पडताळणी अहवाल हा आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा पुणे यांच्याकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे ३१ मे २०२२ पूर्वी समर्पित करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

काही उमेदवारांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांनी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना ऑक्टोबर २०२० मध्ये अटक केली होती. यांच्यासह अन्य ११ व्यक्तींचाही समावेश होता. या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी गुन्हा नोंद झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील युवकानेही नागपूर येथील कार्यालयाकडून बनावट प्रमाणपत्र मिळवले होते.