कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! अशा गंभीर घटना घडणे पोलिसांसाठी लज्जास्पद ! – संपादक
नागपूर – शहरातील जरीपटका भागातील भंगाराच्या खरेदी-विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात आधार कार्ड आढळली आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून ही घटना उघडकीस आणली आहे. जरीपटका पोलिसांनी १०० हून अधिक आधार कार्ड जप्त केली आहेत. मेकोसाबाग परिसरात कचरा वेचणार्या एका व्यक्तीला कचर्याच्या ढिगार्यात आधार कार्डचा १ गठ्ठा मिळाला. त्याने तो गठ्ठा समोरच असलेल्या भंगार दुकानातील मालकाच्या स्वाधीन केला. आधार कार्डवर असलेल्या भ्रमणभाष क्रमाकांवर दूरभाष करून आधार कार्डधारकाकडून २० रुपयांचा मोबदला देऊन ते आधार कार्ड विक्री केले जात होते. ज्यांनी आधार कार्डची मागणी केली, त्यांनाही पैसे घेऊन आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात होते. पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्यांची चौकशी चालू केली आहे.