कुर्ला रेल्वेस्थानकाच्या फलाटावरून धर्मांधांनी दिवसाढवळ्या नेली अंत्ययात्रा !

  • सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता स्वत:च्या हक्काची मालमत्ता असल्याप्रमाणे रेल्वेच्या फलाटावरून अंत्ययात्रा काढणारे उद्दाम धर्मांध ! – संपादक
  • नियमबाह्य वर्तन करणार्‍या धर्मांधांना न रोखणारे प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? – संपादक

मुंबई, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – कुर्ला रेल्वेस्थानकाच्या फलाटावरून १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास मुसलमानांनी अंत्ययात्रा नेली. अचानकपणे आलेल्या अंत्ययात्रेमुळे फलाटावर गाडीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना बाजूला व्हावे लागले. रेल्वेस्थानकाच्या फलाटावरून अंत्ययात्रा नेण्यास अनुमती नसतांना त्याला न जुमानता फलाटावरून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला ७० हून अधिक मुसलमान उपस्थित होते. रेल्वेस्थानकावरील एका प्रवाशाने या अंत्ययात्रेचे व्हिडिओ शुटींग करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला.

 (सौजन्य : sampat jakhotiya)

रेल्वेकडून कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ !

या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे का ? याविषयी माहिती घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने १५ फेब्रुवारी या दिवशी कुर्ला रेल्वेस्थानकावर दूरभाषवर केला होता. या वेळी रेल्वेस्थानकावरून याविषयी माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले; मात्र प्रत्यक्षात रेल्वेस्थानकावरून कारवाईची माहिती देण्यात आली नाही. याविषयी १६ फेब्रुवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने कारवाईविषयी माहिती घेण्यासाठी पुन्हा संपर्क केला असता ‘कारवाईविषयी कळवतो’, असे सांगून काही कळवण्यात आले नाही.