मलप्पूरम् (केरळ) येथे एका मुसलमानाच्या मृत्यूमुळे हिंदूंनी मंदिराचा धार्मिक उत्सव थांबवला !

  • हिंदूंचा सर्वधर्मसभमाव हा नेहमीच एकतर्फी राहिलेला आहे. हा सर्वधर्मसमभाव हिंदूंचा आत्मघात करत असतांना हिंदू त्यातून बोध घेत नाहीत, हा त्यांचा कर्मदरिद्रीपणाच होय !
  • हिंदूंची धार्मिक मिरवणूक मशिदीजवळून नेण्यास देशभरातील अनेक ठिकाणी नेहमीच धर्मांधांकडून विरोध केला जातो. मिरवणुकीवर आक्रमणे केली जातात. पोलीसही तेथून मिरवणूक नेण्यात येऊ नये; म्हणून हिंदूंवर दबाव टाकत असतात, ही वस्तूस्थिती कधी प्रसारमाध्यमे सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !
पुन्नस्सेरी भगवती मंदिर, मलप्पूरम् (केरळ)

मलप्पूरम् (केरळ) – येथे बीरंचिरा गावामध्ये चेराटिल हैदर या ७२ वर्षीय मुसलमानाचा मृत्यू झाल्यानंतर त्या वेळी जवळच्या पुन्नस्सेरी भगवती मंदिरात चालू असलेला वार्षिक धार्मिक उत्सव थांबवण्यात आला. मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला. याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रसिद्ध करतांना हिंदूंच्या सर्वधर्मसमभावाचे कौतुक करण्यात आले आहे. समितीचे उपाध्यक्ष एम्.व्ही. वासू यांनी सांगितले की, हैदर हिंदूंच्या जवळचे होते. ते मंदिराच्या समोरच रहात होते.

पंचायत सदस्य पी. मुस्तफा म्हणाले की, मंदिराच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. हैदर यांच्या अंत्यसंस्करामध्ये मंदिर समितीचे पदाधिकारी आणि अन्य हिंदू सहभागी झाले होते. त्यांनी अशा प्रकारे दाखवलेले प्रेम हेही कौतुकास्पद आहे. (असे प्रेम अन्य धर्मीय हे हिंदूंच्या संदर्भात का दाखवत नाहीत, हे मुस्तफा यांनी सांगितले पाहिजे ! – संपादक)