गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि पंजाब या ५ राज्यांत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…
ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट ! – संपादक

१. ‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. यामधील २९ जणांवरील आरोप निश्चित झाले आहेत, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.’
२. गोव्यात विधानसभा निवडणुकीमध्ये ‘काँग्रेसच्या ३७ उमेदवारांपैकी १७, भाजपच्या ४० पैकी १२, ‘आप’च्या ३९ पैकी ९, तृणमूल काँग्रेसच्या २६ पैकी ७, ‘मगोप’च्या १३ पैकी ६, ‘रिव्हॉल्यूशनरी गोवन्स’च्या ३८ पैकी ५, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी ४, तसेच ‘गोवा फॉरवर्ड’, ‘गोयंचो स्वाभिमान पक्ष’, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार, तसेच अपक्ष ६८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. ४० पैकी ३७ मतदारसंघांत गुन्हे नोंद असलेले उमेदवार आहेत.’
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !