
वेदांमध्ये एक श्लोक आहे, त्याचा अर्थ आहे, ‘जो श्रद्धावान आहे, त्यालाच पुरुषार्थांची प्राप्ती होऊ शकते. इतरांना त्याचा लाभ होत नाही. परमार्थाचे तत्त्व पुष्कळ सूक्ष्म आहे. म्हणूनच वेदही ‘हे भल्या माणसा श्रद्धा ठेव’, असे सांगतात. ४ पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी त्यांची ४ नावे आहेत. यातील अर्थ आणि काम या २ पुरुषार्थांविषयी कुणाला विशेष शंका असत नाही; पण त्यांना नियंत्रित ठेवण्याचे कार्य धर्म करतो आणि खोलवर विचार केला की, हे नियंत्रण मोक्षाची दिशा दाखवत असते. मनुष्याच्या सर्वांग परिपूर्ण अशा सुखी समाधानी जीवनासाठी या चारहींचा उपयोग उण्या-अधिक प्रमाणात कळत-नकळत माणसे करत असतात. तसे करणे अपरिहार्य असते. जर याकडे दुर्लक्ष झाले किंवा स्वार्थी भावनेने या संकल्पनांवर अतिक्रमण केले, तर ती व्यक्ती, समाज आणि देश यांना स्वार्थी अतिक्रमणाच्या प्रमाणात दुःख आणि दैन्य सोसावे लागतेच. यासाठीच हिंदु परंपरेने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांचा त्यातही विशेषरितीने धर्म, अर्थ अन् काम यांचा सूक्ष्म दृष्टीने विचार करून तद्नुसार बारीकसारीक, सूक्ष्म आणि व्यापक असे नीतीनियम वा निर्बंध सांगितले आहेत. भूक लागली की, खावेसे वाटणे, हे स्वाभाविक आहे; पण केव्हा, कसे, कुणाचे, काय आणि कुणी खावे, यासंबंधी नियम आहेत. ते पाळले गेले नाहीत, तर हानी होण्याची शक्यता असते. मग आपण त्याला धर्मशास्त्र, आरोग्यशास्त्र किंवा शासकीय निर्बंध हे काहीही माना.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !