
श्रीयंत्राच्या खालच्या बाजूला असलेल्या प्रकृतीदर्शक त्रिकोणाच्या मध्यभागी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि उत्तरेला पुरुष त्रिकोणाच्या मध्यभागी मथुरा अन् वृंदावन ही पवित्र क्षेत्रे आहेत. त्याच्या दक्षिण आणि उत्तर टोकांना शंकराची स्थाने, तर पूर्व, पश्चिम अन् दोन्ही त्रिकोणांमध्ये श्रीकृष्णाची स्थाने आहेत. पंढरपूर हे पवित्र धाम आणि महान तीर्थक्षेत्र आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात पृथ्वीवर भारताचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व भारतात महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राइतके संत आणि संतांविषयीचे लिखाण भारतात अन्यत्र कुठेच झाले नाही. भक्तश्रेष्ठ पुंडलिकाने आपल्या भक्तीने या पवित्र धामाचे महत्त्व वाढवले आहे.
– परात्पर गुरु पांडे महाराज
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !