‘साधकांनो, ‘मला जमणार नाही’, यापेक्षा ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीच करू शकत नाही’, असा भाव ठेवला, तर देवच साहाय्य करील. साधकांनी एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करायला हवा. ‘मला जमणार नाही’, असा विचार केल्यास नकारात्मकता येते; पण ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीही करू शकत नाही’, असा विचार केल्यास आपला अहं न्यून होतो आणि आपल्याला सतत कृतज्ञताभावात रहाता येते.’
– सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था