१. श्री सातेरी आणि श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर तेथून ‘बाहेर येऊच नये’, असे वाटणे, मंदिरातून बाहेर आल्यानंतर हातावर दैवी कण आढळणे आणि चैतन्य मिळत असल्याचे जाणवणे
‘आम्ही रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर ५.२.२०१७ या दिवशी येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेलो होतो. श्री सातेरी आणि श्री महालक्ष्मी देवींच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर तेथून ‘बाहेर येऊच नये’, असे मला वाटले. ‘केशरी रंगाची साडी नेसून साक्षात् देवीच तिथे आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझी ‘प.पू. गुरुमाऊलीचा महामृत्युयोग टळावा आणि सर्व साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी देवींच्या चरणी प्रार्थना झाली. मंदिरातून बाहेर आल्यानंतर माझ्या हातावर पिवळ्या रंगाचे दैवी कण आढळले. त्या वेळी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
२. रामनाथी आश्रमात झालेल्या विष्णुयागाच्या दुसर्या दिवशी प्रथमच गरुडाचे दर्शन होणे आणि भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त होणे
१०.२.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रमात विष्णुयाग झाला. दुसर्या दिवशी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचना सत्र आणि सारणी लिखाण करण्यासाठी दुसर्या माळ्यावरील आगाशीत बसले होते. तेव्हा मला गरुडाचे पहिल्यांदाच दर्शन झाले. मी एक मिनिट गरुडाकडे पहातच होते. तो गरुड आश्रमाच्या दिशेने येत होता. तो ‘श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी येत आहे’, असे मला वाटले. त्याच्याकडे बघून माझी भावजागृती झाली आणि गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.
गुरुमाऊलीच्या अपार कृपेमुळेच मला या अनुभूती आल्या. मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अश्विनी हणमंत कदम (आताच्या सौ. उन्नती सुमित खामणकर), रहिमतपूर, जिल्हा सातारा. (१२.२.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |