विजेच्या दिव्यामुळे होणारे लाभ आणि हानी

‘देवाने रात्री अंधार केला आहे. मानवाने विजेच्या दिव्यामुळे तो न्यून केला आहे. विजेच्या दिव्यामुळे होणारे लाभ आणि हानी यांची माहिती येथे दिली आहे.

श्री. निषाद देशमुख

१. विजेच्या दिव्यामुळे होणारे लाभ आणि हानी अन् त्याचा एकूण परिणाम

टीप : या सारणीतील माहिती सर्वसाधारणपणे वापरण्यात येणार्‍या विजेच्या दिव्यांच्या संदर्भातील आहे. सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या विजेच्या दिव्यांमध्ये तमोगुण अधिक प्रमाणात असल्याने त्यातून लाभ अल्प प्रमाणात होऊन हानी अधिक प्रमाणात होते.

२. जिवाकडून केल्या जाणार्‍या वापरानुसार विजेच्या दिव्यातून होणारे लाभ आणि हानी यांचे प्रमाण पालटण्यामागील कारण

‘सर्वसामान्य जिवांनी विजेच्या दिव्याचा वापर केल्यावर त्यांना अधिकाधिक १० टक्के लाभ होतो. याउलट साधनेसाठी त्यांचा वापर केल्यावर ४० टक्क्यांपर्यंत लाभ होतो.

२ अ. सर्वसामान्य जिवांना विजेच्या दिव्यातून लाभ होण्यामागील कारण : विजेच्या दिव्यातून प्रक्षेपित होणारा प्रकाश मुळात तमोगुणी असून तेजतत्त्वाशी निगडित असतो. सर्वसाधारण जिवांची आध्यात्मिक पातळी सर्वसाधारण असल्याने ते विजेच्या दिव्यातून प्रक्षेपित होणार्‍या तमोगुणी प्रकाशाचा वापर सजावट, मनोरंजन, स्वतःचे वैयक्तिक कार्य इत्यादी मायेतील आणि पृथ्वी अन् आप या तत्त्वांशी निगडित कार्यांसाठी करतात. या कार्यांमधून सर्वसाधारणतः चैतन्य प्रक्षेपित होत नाही किंवा अत्यल्प प्रमाणात प्रक्षेपित होते. यामुळे विजेच्या दिव्यातून प्रक्षेपित होणारा तमोगुणी प्रकाशाचा परिणाम सर्व कर्मांवर होत असल्याने जिवाला त्यातून लाभ होऊ शकतो.

२ आ. ईश्वराच्या समष्टी कार्यासाठी विजेच्या दिव्याचा वापर केल्यावर त्यातून ४० टक्के लाभ होण्याचे कारण : सत्संग आणि सत्सेवा अशा समष्टी अन् ईश्वरी कार्याशी निगडित कर्मांच्या माध्यमांतून तेज, वायू आणि आकाश या उच्च तत्त्वांशी निगडित चैतन्य वायूमंडलात प्रक्षेपित होते. या चैतन्याचा परिणाम विजेच्या दिव्यातून प्रक्षेपित होणार्‍या तमोगुणी प्रकाशावर होऊन त्यातील तमोगुण अल्प होते किंवा नष्ट होते. आकाशतत्त्व कार्यरत असलेल्या परिसरात अत्यधिक प्रमाणात कार्यरत चैतन्याच्या परिणामामुळे दिव्यातील तमोगुण नष्ट होऊन तो सात्त्विक होतो, उदा. रामनाथी आश्रमातील अंतर्गत रस्त्यावर असलेले विजेचे दिवे. यामुळे ईश्वराच्या समष्टी कार्यासाठी विजेच्या दिव्यांचा वापर केल्यावर त्यातून होणारे लाभ आणि हानी यांचे प्रमाण अनुक्रमे ७० आणि ३० टक्के होऊन त्यामुळे जिवाला ४० टक्के लाभ होतो.

३. निष्कर्ष

देवाने संबंधित कर्मांसाठी ठरवलेल्या वेळांचे पालन केल्यास जिवाला सर्वाधिक लाभ होतो. यामुळे अंधार झाल्यावर कार्य न करता झोपणे आणि ब्राह्ममुहुर्तावर उठून कार्य करणे, आदर्श गणले जाते. असे असले तरी परिस्थिती आणि काळ पूरक नसतांनाही साधनेच्या उद्देशाने मानवनिर्मित पर्यायांचा वापर केल्यावरही जिवाला मिळणार्‍या लाभाचे प्रमाण वाढते. यातून मनुष्य करत असलेल्या कर्मांचा साधनेच्या संदर्भात विचार करण्याचे महत्त्व लक्षात येते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०१८, दुपारी ४.२५)

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक