प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघ मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे आयोजन !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सनातन संस्था आमचेच कार्य करत आहे. या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर इथून परत बाहेर जायची इच्छा होत नाही. मागील वेळी वाराणसी येथील आपल्या सेवाकेंद्रात सकाळी आलो, त्यानंतर संध्याकाळपर्यंत कसा वेळ गेला कळलेच नाही. संस्थेच्या कार्याला आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे कौतुकोद्गार अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांनी व्यक्त केले. प्रतिवर्षीप्रमाणे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे होणार्या माघ मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला श्री. पांडे यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
क्षणचित्रे
१. ‘तुम्हाला (प्रदर्शनावर सेवा करणार्या साधकांना) निवास आणि भोजन यांसाठी काही अडचण नाही ना ?’, याविषयी श्री. पांडे यांनी प्रेमपूर्वक चौकशी केली.
२. श्री. जगजीतन पांडे यांनी त्यांच्या स्वतःच्या शिबिरात साधकांच्या रहाण्याची आणि प्रदर्शन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
यावर्षी माघ मेळ्यामध्ये सनातन संस्थेचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन ७ फेब्रुवारी २०२२ या दिवशीपर्यंत खुले आहे. सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथसंपदा आणि सात्त्विक पूजा साहित्यासाठी अधिकाधिक भाविकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ : काली मार्ग (दक्षिण बाजू), परेड मैदान, (जिल्हा अपराध निरोधक समितीच्या समोर), सेक्टर २, प्रयागराज, उत्तरप्रदेश