एकाच परिवारातील १० सदस्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या संभाजीनगर येथील अद्वितीय देशपांडे परिवाराचे अभिनंदन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातनच्या मार्गदर्शनाखाली सहस्रो साधक साधना करत आहेत. तसेच कुटुंबातील सर्व सदस्य आणि नातेवाईक साधना करत आहेत, असे शेकडो परिवारही आहेत; पण साधना करून ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेले एकाच परिवारात १० सदस्य असणारे परिवार सनातनमध्ये विरळा आहेत. त्यांतीलच एक परिवार आहे संभाजीनगर येथील देशपांडे परिवार !

सौ. छाया देशपांडे

नुकतीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या संभाजीनगर येथील सौ. छाया देशपांडे यांच्यासह त्यांच्या परिवारातील १० सदस्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. याबद्दल देशपांडे परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडे !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१.२०२२)

सौ. छाया देशपांडे यांचे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेले कुटुंबीय