१. भारताच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय म्हणजे हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान निर्माण करणे !
‘राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान नसलेली जनता तशाच लोकप्रतिनिधींना निवडते. त्यामुळे देश अधोगतीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदूंमध्ये राष्ट्र अन् धर्म यांचा अभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे. हे आतापर्यंत कोणी केले नाही; म्हणून त्यांना दोष देण्यापेक्षा आपल्याला करता येईल, ते प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.’
२. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला ?
‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो हिंदू कारागृहात गेले आणि सहस्रो हिंदू फासावर चढले किंवा इंग्रजांच्या गोळीबारात मृत झाले. ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला ?’, असा प्रश्न मुसलमानांना विचारायचे धाडस एकाही हिंदूत नाही. याचा परिणाम हा की, स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात मुसलमान सांगतात, ‘हसके लिया पाकिस्तान ।’ ते सत्यच आहे. आता मुसलमान ‘लडके लेंगे हिंदुस्तान ।’ ही त्यांची घोषणा सत्यात आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत आणि हिंदू मात्र त्यांना सलाम करण्यासाठी चढाओढ करत आहेत !’
३. ‘भारतातील सर्वपक्षीय राज्यकर्त्यांची भ्रष्टाचाराने जमवलेली संपत्ती सरकारजमा केली, तर भारताला जगात भीक मागावी लागणार नाही.’
४. ‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७१ वर्षे भारतावर राज्य केलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’
५. ‘९०० वर्षे पारतंत्र्यात असलेला जगातील एकमेव देश म्हणजे भारत’, ही भारताची ओळख पुसून ‘ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारा जगातील एकमेव देश म्हणजे भारत’ ही ओळख आपल्याला जगाला करून द्यायची आहे.’
६. प्रत्येक पिढीचे कर्तव्य !
‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यासंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’
७ ‘हिंदु राष्ट्रातील जनता १५ ऑगस्ट, २६ जानेवारी असे राष्ट्रीय दिवस सुट्टी म्हणून दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहाण्यात घालवणार नाही, तर समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या सेवेसाठी वापरील.’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले